
हिंदुस्थानी शेअर बाजार गुरुवारी अखेरच्या क्षणी उसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 79.27 अंकांनी वाढून 80,623 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 21.95 अंक वधारून 24,596 अंकांवर बंद झाला. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन आज 445.54 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास 35 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सेन्सेक्समधील टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजी, इटर्नल, ऑक्सिस बँक, मारुती सुझुकीचे शेअर्स वाढले. रशियाचे राष्ट्रपती क्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लवकरच भेट होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बाजारात सकारात्मकता दिसली. व्यापार तणाव कमी होण्याची आशा असून यामुळे ऑटो, फार्मा, मेटल्स, एनर्जीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.