
शेअर बाजार चार दिवसांनंतर घसरला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 452 अंकांनी घसरून 83,606 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 120 अंकांनी घसरून 25,517 अंकांवर बंद झाला. रिलायन्स, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स घसरले.