
अर्थसंकल्प रविवारी सादर होत असल्याने आज शेअर बाजारात व्यवहार सुरू राहणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शएअर बाजाराने सावध प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी शेअर बाजार घसरणीने बंद झाले होते. त्यामुळे रविवारी बाजाराची दिशा काय असेल, याबाबत चर्चा सुरू होती. अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा झाल्यास बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी बाजाराने सावध प्रतिक्रिया दिली आहे.
अर्थसंकल्पपूर्वी शेअर बाजार सुरू होताच त्यात घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०० अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्ये ६२.७० ची घसरण झाली. सोन्या-चांदीचे दर घसरल्याचा फटका मेटल सेक्टरला बसला असून वेदांत, हिंदुस्तान झिंक आणि हिंदुस्तान कॉपरमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. निफ्टी २५,३०० च्या खाली व्यवहार करत होता. तर सेन्सेक्स ८२,२०० वर व्यवहार करत होता. मात्र, काही वेळातच बाजाराने रिकव्हरी करत बाजारात किरकोळ तेजी दिसत आहे.
शुक्रवारी बाजार बद होताना निफ्टी १०० अंकांनी घसरून २५,३०० वर बंद झाला, तर सेन्सेक्स २०० पेक्षा जास्त अंकांनी घसरून ८२,२७० वर बंद झाला. रविवारी बाजार सुरू होताच घसरणीनंतर आता थोडी तेजी दिसत आहे. 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 220.16 अंकांनी म्हणजेच 0.27 टक्क्यांनी वाढून 82,490.09 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 45.50 अंकांनी म्हणजेच 0.18% वाढून 25,366 वर व्यवहार करत आहे.
बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी फक्त ११ शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत, तर १९ शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. टाटा स्टील, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि बजाज फायनान्सचे शेअर्स घसरले आहेत. ऑटो, फार्मा, एफएमसीजी आणि बँकिंग वगळता सर्व क्षेत्रांमध्ये सुमारे १% घसरण झाली आहे. बाजार उघडताच, हिंदुस्तान झिंकचे शेअर्स १०%, हिंदुस्तान कॉपरचे शेअर्स १८% पेक्षा जास्त घसरले, हिंदुस्तान अॅल्युमिनियमचे शेअर्स जवळपास ५% घसरले आणि हिंदाल्कोचे शेअर्स ७% घसरले. तथापि, संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. बीईएल आणि डेटा पॅटर्न सारखे शेअर्स सुमारे २% वाढीसह व्यवहार करत आहेत.























































