श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा ‘स्त्री 2’ बॉक्स ऑफिसवर नवनवीन रेकॉर्ड करत आहे. ‘स्त्री 2’ सातव्या विकेंडला सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय. बॉलीवूडमध्ये इतिहास रचत ‘स्त्री 2’ ने ‘बाहुबली 2’, ‘केजीएफ’ 2′, ‘आरआरआर’ सारख्या सिनेमांना मागे टाकलेय.
‘स्त्री 2’ ने सातव्या शुक्रवारी 90 लाख रुपयांचे कलेक्शन केले. शनिवारी सिनेमाचे कलेक्शन 130 टक्क्यांनी वाढून 2.1 कोटी रुपये एवढे झाले. रविवारी हे आकडे आणखी वाढले आणि सिनेमाने 2.65 कोटी रुपये कमावले. त्यामुळे सातव्या आठवड्याची एकूण कमाई 5.65 कोटी रुपये झाली आणि सिनेमाची आतापर्यंतची एकूण कमाई 588.25 कोटी रुपये झाली.
सातव्या आठवड्यात ‘स्त्री 2’ने अन्य तगड्या सिनेमांना धोबीपछाड दिली. प्रभासच्या ‘बाहुबली 2’ने सातव्या आठवड्यात पाच कोटी रुपयांची कमाई केली होती. ज्युनिअर एनटीआर आणि रामचरणच्या ‘आरआरआर’ने सातव्या आठवड्यात 4.5 कोटी रुपये कलेक्शन केले होते. यशच्या ‘केजीएफ 2’ने 1.84 कोटी रुपये कमावले. नाग अश्विनच्या ‘कल्की’ चे कलेक्शन फक्त 15 लाख रुपये होते. म्हणजेच सातव्या आठवड्यात ‘स्त्री 2’ची जबरदस्त वाटचाल सुरू असलेली दिसतेय.