ट्रेंड – गुरू असावा तर असा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षकाने अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला आहे; तो पाहून तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.  शिक्षकाने संपूर्ण वर्ग सजवला आहे. फुलांचा वर्षाव करून प्रत्येक विद्यार्थ्याला पेन भेट म्हणून दिला. त्यानंतर त्यांना टिक्का लावून खाणेसुद्धा दिले. त्यानंतर काही मोजक्या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सल्लेसुद्धा दिले. विद्यार्थी शिक्षकाचे प्रेम पाहून ढसाढसा रडताना दिसत आहेत. विद्यार्थी सन्मानाने शिक्षकाच्या पाया पडत आहेत. तर कोण त्यांना मिठी मारून रडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @r_y_s_classes या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.