
आज १५ जानेवारी रोजी गुरुवारी राज्याच्या २९ महानगरपालिकीचे मतदान प्रक्रिया सुरू आहे , अशातच भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या कुटुंबांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते माध्यामांशी बोलताना त्यांनी पक्षश्रेष्ठींविषयी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सर्व निर्णय घेणारे वरिष्ठ आहेत, त्यामुळे मला यातले काही कळत नाही.
सुभाष देशमुख आपल्या कुटुंबासह मतादान केंद्रावर मतदान करायला आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यामांशी बोलताना काही महत्तवाच्या गोष्ट्यांवर भाष्य केले. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून पक्ष आणि पालकमंत्र्याबाबतची त्यांची नाराजी स्पष्ट दिसून आली. गेल्यावेळी सोलापूर महानगरपालिकेवर आमदार सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांनी ४९ जागा जिंकवून सत्ता आणली होती. यावेळी हे दोघ ही प्रचारत कुठे ही दिसले नाही, यासंदर्भात विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही प्रचार केला पण माध्यमांसमोर आलो नाही. गेल्या वेळी आम्ही दोघांनी ४९ जागा आणल्या होत्या आता तर तीन आमदार आहेत त्यामुळे आता तर जास्त जागा आल्या पाहिजेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
तसेच युतीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर देशमुख म्हणाले की, सर्व निर्णय वरचे घेतात मला त्यातले काहीही कळत नाही. मैत्रीपूर्ण लढायचेही म्हणतात आणि टीका करायची नाही असेही म्हणतात. मला हे राजकरण कळत नाही. मी सामान्य माणूस, हे असले राजरकण मला कळत नाही, अशा तीव्र शब्दात त्यांनी पक्षश्रेष्ठींविषयी नाराजी बोलून दाखवली.
नेमकं देशमुखांच्या नाराजीचे कारण काय?
आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर विरोधक माजी आमदार दिलीप माने यांना पालकमंत्र्यांने पक्षात आणल्याने देशमुखांची नाराजी होती. त्यातच त्यांच्या काही कार्यकाऱ्यांची तिकीट कापल्याने ते संपूर्ण प्रचारापासून दूर होते. पालकमंत्र्यांनी पक्षात विरोधकच आणल्याने सुभाष देशमुख खूपच नाराज झाल्याच दिसून येत आहे.






























































