सुनील शेट्टीच्या फोटोचा गैरवापर; हायकोर्टात धाव

कोणतीही परवानगी न घेता आपले व आपल्या नातीचे फोटो काही कंपन्यांकडून सोशल मीडियावर वापरण्यात आल्याने अभिनेता सुनील शेट्टी याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सदर फोटो तात्काळ हटवण्यात यावेत व भविष्यात आपले फोटो वापरण्यावर संबंधित कंपन्यांना बंदी घालावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली असून न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे.

याप्रकरणी सुनील शेट्टी यांनी कौन्सिल बिरेंद्र सराफ यांच्या मार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आज शुक्रवारी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपिठासमोर सुनावणी घेण्यात आली. सराफ यांनी निदर्शनास आणून दिले की शेट्टी आणि त्यांच्या नातीच्या बनावट प्रतिमा काही वेबसाइटवर आहेत. त्यांच्या फोटोंवर त्याचा अधिकार असून कोणतीही परवानगीशिवाय ते प्रसारित करणे त्याच्या प्रतिष्ठsला हानी पोहोचवत आहे. त्यामुळे ते तात्काळ हटवण्यात यावे न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला व सुनावणी तहकूब केली.