
मुंबईत फेब्रुवारीपासून कडक उन्हाळा सुरू झाला असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एप्रिलला उन्हाळा अधिक तापदायक असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाढत्या उन्हाळ्याचा सर्वाधिक फटका वृद्धांना आणि शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 22 एप्रिलपर्यंत संपणार आहे. मुंबईतील वाढत्या तापमानाची दखल घेत पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात संपतील, असे नियोजन करण्याची मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केली.



























































