कश्मीरच्या लढ्याला पाठिंबा; पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली, मुनीरने फणा काढला

कश्मीर ही पाकिस्तानची दुखरी नस आहे, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी करणारे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसीम मुनीर यांनी पुन्हा फणा काढला. ‘‘कश्मीरमधील कायदेशीर स्वातंत्र्य लढय़ाला आम्ही राजकीय, कूटनीतीक व नैतिक पाठिंबा देतच राहू,’’ असे मुनीर म्हणाले. जम्मू-कश्मीरमधील बंडखोर गटाच्या कारवायांना हिंदुस्थान सरकार दहशतवाद म्हणते. मात्र प्रत्यक्षात तो एक कायदेशीर लढा आहे, असे तारे मुनीरने तोडले.