
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले असून ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही हिंदुस्थानी सैन्याचे सर्वत्र कौतुक होत असतानाच विविध उद्योग संघटनांनी सरकारला आपला पाठिंबा दर्शवला आहे. रिअल इस्टेटमधील क्रेडाई संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत कोणत्याही पायाभूत सुविधा लागल्यास क्रेडाई मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. क्रेडाईने लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की आम्ही देशभरातील विकासकांशी संपर्क साधला असून युद्धजन्य परिस्थितीत सरकारला अत्यावश्यक इफ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. विकासकांनीही सरकारला मदत करण्यास सहमती दर्शवली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनीही सशस्त्र दलाला पाठिंबा दिला आहे. ऑपरेशन सिंदूरसाठी आम्हाला आमच्या हिंदुस्थानी दलाचा अभिमान आहे. सर्वप्रकारच्या दहशतवादाविरुद्ध हिंदुस्थान एकजुटीने आणि अढळपणे उभा आहे, असे अंबानी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.