बालकांच्या तस्करीचा प्रश्न दिवसेंदिवस भयावह – सर्वोच्च न्यायालय

बालकांच्या तस्करीचा प्रश्न दिवसेंदिवस भयावह होत चालल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी याबाबत चिंता व्यक्त केली. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर द्वारका परिसरातील नवजात बालकांच्या तस्करीच्या प्रकरणाबाबत सुनावणी झाली.

न्यायाधीश पारडीवाला यांनी बालकांच्या तस्करीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच बालकांच्या तस्करीत गुंतलेली टोळीप्रमुख पूजा आणि तीन बेपत्ता बालकांना शोधण्याकरिता त्वरित पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बालकांच्या तस्करीमध्ये पालकांचाच सहभाग असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. ‘तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत या हरवलेल्या मुलांना शोधून काढावे लागेल आणि मुख्य सूत्रधाराला अटक करावी लागेल,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.