
पूजा खेडकरने कोणता मोठा गुन्हा केला? ती ड्रग्ज माफिया नाही किंवा दहशतवादीही नाही. तिच्यावर खुनाचाही आरोप नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला आज अटकपूर्व जामीन मंजूर केला. तुमच्याकडे अशी कोणती प्रणाली किंवा सॉफ्टवेअर असले पाहिजे जेणेकरून अशा प्रकरणांचा तपास वेगाने पूर्ण होईल. आता खेडकरला कुठेही नोकरी मिळणार नाही, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात आधीच जामीन मंजूर करायला हवा होता, परंतु दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी खेडकरच्या जामिनाला विरोध केला. पूजा तपासात सहकार्य करत नाही, तिच्यावर गंभीर आरोप आहेत असे दिल्ली पोलिसांनी म्हटले होते. दरम्यान, पूजा खेडकरवर पेंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोटय़ांतर्गत आरक्षण मिळवण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप आहे.