NEET PG Exam 2024 – ऐनवेळी कसा देणार आदेश? परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका SC ने फेटाळली

येत्या 11 ऑगस्टला म्हणजे रविवारी NEET PG Exam होणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. 2 लाख विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात घालणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळात स्पष्ट केले.

लाखो विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे. यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश ऐनवेळी देऊ शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने नमूद केले. अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र अशा शहरांमध्ये आहेत, जिथे त्यांना पोहोचणंही अवघड आहे, असे याचिकाकर्त्याने म्हटले होते.

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळी केंद्र देण्यात आली आहेत. पण वेळेअभावी विद्यार्थ्यांना त्या शहरांपर्यंत प्रवासाची व्यवस्था करणं अवघड झालं आहे, असे याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या बाजूने वरिष्ठ अधिवक्ते संजय हेगडे यांनी युक्तीवाद केला. जवळपास 50 हजार विद्यार्थ्यांनी यासाठी मेसेजेस केल्याचा दावा संजय हेगडे यांनी केला.