प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांकडून दिलगिरी, क्षुल्लक मुद्याला जास्त महत्त्व देऊ नका;सर्वोच्च न्यायालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबईत आल्यावर राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) न पाळणाऱया सनदी अधिकाऱयांनी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे क्षुल्लक मुद्दय़ाला जास्त महत्त्व देऊ नका, प्रकरण थांबवा अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत, तसे प्रसिद्धीपत्रकच सुप्रीम कोर्टाकडून जारी करण्यात आले आहे.

14 मे रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कारसोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. सरन्यायाधीश झाल्यानंतर, न्यायमूर्ती बी.आर. गवई रविवारी पहिल्यांदाच मुंबईत आले होते. राजशिष्टाचारनुसार मुख्य सचिव, डीजीपी आणि मुंबई पोलीस आयुक्त त्यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचले नाहीत. यावर सरन्यायाधीशांनी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या कार्यक्रमात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुंबई भेटीदरम्यान प्रोटोकॉल न पाळणाऱया सनदी अधिकाऱयांवर महिनाभरात कारवाई करण्यात यावी अशी मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने केली आहे. बार कौन्सिलने याबाबत आज घेतलेल्या सर्वसाधारण सभेत या बाबतचा ठराव मंजूर केला असून दोषी अधिकाऩयांवरील कारवाईच्या मागणीचा ठराव मुख्यमंत्र्यांसह हायकोर्टाला सादर केला आहे.