
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे कार्यतालिकेत 40 व्या क्रमांकावर शिवसेनेचे प्रकरण सूचीबद्ध आहे. मागील तीन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारच्या सुनावणीवेळी नेमके काय होणार, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


























































