विक्रमांची बरसात करण्यासाठी सूर्या तळपणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-न्यूझीलंड टी-20 मालिकेचा निर्णायक सामना केवळ निकालापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आता यांच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक क्षण ठरण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी होणाऱ्या या लढतीत सूर्यकुमारकडे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 3000 धावांचा टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी आहे.

आतापर्यंत 97 डावांत 2967 धावा करणाऱ्या या आक्रमक फलंदाजाला हा मैलाचा दगड गाठण्यासाठी केवळ 33 धावांची आवश्यकता आहे. हा टप्पा पार होताच सूर्यकुमार टी20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान 3 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत झपाटय़ाने वर झेपावेल. विशेष म्हणजे, जर हा पराक्रम 98व्या डावात साकार झाला तर तो हिंदुस्थानच्या दिग्गज रोहित शर्माला मागे टाकेल, रोहितला हा टप्पा गाठण्यासाठी 108 डाव लागले होते, आणि थेट यांच्या बरोबरीला जाईल.

धावांसोबतच षटकारांच्याही बाबतीत सूर्या इतिहासाच्या उंबरठय़ावर उभा आहे. नंबर चारच्या स्थानावर फलंदाजी करताना त्याने आतापर्यंत 199 षटकार ठोकले असून, एकच षटकार त्याला या स्थानावर 200 षटकार पूर्ण करणारा पहिला फलंदाज बनवू शकतो. याशिवाय, कर्णधार म्हणून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 49 षटकार नोंदले गेले आहेत आणि आणखी एक षटकार हा 50 षटकारांचा कर्णधारी विक्रमही त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करेल.