अंधेरीतील स्वप्नाक्षय मंडळ ठरले सर्वोत्कृष्ट, पालिकेची श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा

मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेमध्ये सातबंगला येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळाने प्रथम पुरस्कार पटकावला. भायखळा येथील पंगेरीचाळ सार्वजनिक उत्सव मंडळाने द्वितीय तर विक्रोळी येथील बालमित्र कला मंडळाने तृतीय पुरस्कारावर मोहोर उमटवली.

शाडू मातीच्या सर्वोत्कृष्टमूर्तीचा पुरस्कार माहीम येथील शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास तर सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक राजन झाड यांना मालवणी येथील युवक उत्कर्ष मंडळाच्या गणेशमूर्तीसाठी जाहीर झाले. सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचा पुरस्कार श्रीकांत साळवी यांना जाहीर झाला. अवयवदान जागृतीसाठी दहिसरच्या श्रद्धा मित्र मंडळास तर पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी अंधेरी (पूर्व) येथील शिवगर्जना तरुण मित्र मंडळ आणि लोअर परळ येथील ओमसिद्धी विजय मित्र मंडळ यांना पारितोषिके जाहीर झाली. धारावी येथील हनुमान सेवा मंडळ आणि साकीनाका येथील परेरावाडा मोहिली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित झाली आहेत.

प्रशस्तीपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळ

नेपथ्य ः परळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, संकल्पना ः रंगारी बदक चाळ, विषय मांडणी ः पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, सुबक मूर्ती ः ताराबाग गणेशोत्सव मंडळ, भायखळा, भव्य आरास ः पर्ह्टचा राजा, उत्कृष्ट संकल्पना ः शिवसम्राट उत्सव मंडळ,  सजावट ः विकास मंडळ, साईविहार, भांडुप, नावीन्यपूर्ण माहिती ः शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ, कांजूरमार्ग (पूर्व), प्रसन्न वातावरण निर्मिती ः प्रतीक्षा नगर गणेशोत्सव मंडळ, सुंदर देखावा ः अखिल भटवाडी उत्सव मंडळ, घाटकोपर, उल्लेखनीय विषय मांडणी ः भावदेवी गणेशोत्सव मंडळ, दहिसर, समाज प्रबोधन ः गणेशोत्सव मंडळ, कस्तुर पार्क, बोरिवली, नेपथ्य ः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पारशीवाडा, अंधेरी (पूर्व), शैक्षणिक जनजागृती ः गणेश क्रीडा मंडळ, काजूवाडी, अंधेरी (पूर्व), राष्ट्रपुरुषांचे विचार ः बेस्ट नगर गणेशोत्सव मंडळ, गोरेगाव (पश्चिम).