अमेरिकेतही हिंदुस्थानचाच जयघोष; बुमराच्या माऱ्यापुढे पाकिस्तानचा खेळ खल्लास

वर्ल्ड कप कुठेही असोत पाकिस्तानसमोर फक्त हिंदुस्थानचाच आवाज घुमतो, हे पुन्हा एकदा अवघ्या जगाने पाहिले. हिंदुस्थानच्या फलंदाजांनी माती खाल्ल्यानंतर जसप्रीत बुमरा, हार्दिक पंडया आणि अर्शदीप सिंहच्या माऱयाने वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानला पुन्हा एकदा लोळविले. हिंदुस्थानच्या 120 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करणाऱया पाकिस्तानी संघाला बुमराच्या अचुकतेपुढे 6 धावांनी मात खावी लागली. हिंदुस्थानकडून मिळालेल्या या पराभवामुळे पाकिस्तानचा टी-20 वर्ल्ड कपमधूनही खेळ खल्लास झाला आहे. आता केवळ अमेरिकेचे सलग दोन पराभवच त्यांना संजीवनी देऊ शकतात जे निव्वळ अशक्य आहे.

हिंदुस्थानच्या 120 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमने चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला, पण जसप्रीत बुमराने आपल्या पहिल्याच षटकात बाबरला बाद करून हिंदुस्थानला अपेक्षित सुरुवात करून दिली. त्यानंतर अर्शदीप, हार्दिक पंडय़ा आणि अक्षर पटेलने अचूक मारा करत पाकिस्तानला दबावाखाली ठेवण्याची किमया साधली. पण त्यानंतर मोहम्मद रिझवानने पाकला सावरण्याचा खेळ केला. 3बाद 80 अशा सुस्थितीत असलेल्या पाकिस्तानला हादरवले ते बुमराने . त्याने आपल्या दुसऱया स्पेलमध्ये रिझवानला त्रिफळाचीत करत ंिहदुस्थानला सामन्यात आणले आणि त्यानंतर भन्नाट मारा करत सामन्यावर पकड मजबूत करत हिंदुस्थानचा विजय निश्चित केला. बुमराने 14 धावांत 3 विकेट घेत हिंदुस्थानला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध संस्मरणीय विजय मिळवून दिला.

त्याआधी पुन्हा एकदा विराट कोहलीच सलामीला उतरला, पण तो आजही अपयशी ठरला. मात्र तो लवकर बाद झाल्यानंतर रोहित शर्माकडून अपेक्षा होती, पण तोसुद्धा 13 धावावर बाद झाल्यामुळे हिंदुस्थान अडचणीत सापडला. तेव्हा पाकिस्तानच्या मेहरबानीमुळे ऋषभ पंत आणि बढती मिळालेल्या अक्षर पटेलने खणखणीत फटकेबाजी करत संघाला पॉवर प्लेमध्ये अर्धशतक गाठून दिले. पटेलची फटकेबाजी 20 धावांवर थांबली. पुढे सूर्यकुमारकडून चौफेर फटकेबाजीची अपेक्षा होती, पण तोही चाचपडतच खेळत राहिला आणि बादही झाला.

 

30 धाकांत  7 किकेट

3 बाद 89 करून हिंदुस्थानची 7 बाद 96 अशी घसरगुंडी उडाली. किशेष म्हणजे पाकिस्तानी गोलंदाजांनी किकेट काढल्या नाहीत तर हिंदुस्थानी फलंदाजांनी आपल्या किकेट गमाकल्या. 4 षटकांत केकळ 7 धाकांत 4 किकेट गमाकल्यामुळे हिंदुस्थानला 20 षटके खेळणेही कठीण झाले. पुढे तळाच्या फलंदाजांनी 23 धाकांची भर घातली, पण सर्कात काईट म्हणजे हिंदुस्थानचा डाक 19 क्या षटकातच 119 धाकांकर संपला. 8 षटकांत 30 धाकांत

 

हिंदुस्थानी फलंदाजांचा आत्मघाती खेळ

खेळपट्टीच्या घातकी खेळापेक्षा हिंदुस्थानी फलंदाजांचा आत्मघाती खेळ अधिक भयंकर होता. 11 षटकांत 3 बाद 89 धावा केल्या होत्या. हिंदुस्थान 150 पेक्षा अधिक धावा करण्यासाठी सज्ज होता. पण त्याचवेळी सूर्यकुमार यादवने फेकलेली आपली विकेट संघासाठी फारच घातक ठरली. ही विकेट पडल्यानंतर हिंदुस्थानी फलंदाजांचा आत्मघातकी खेळ आणखी वाढला. पाकिस्तानच्या सामान्य भासणाऱया गोलंदाजीला प्रभावी करण्याची किमया हिंदुस्थानी फलंदाजांनी केली. सूर्यानंतर शिवम दुबेनेही घोर निराशा केली. त्याची फलंदाजी पाहून हिंदुस्थान प्रचंड दबावाखाली असल्याचा भास झाला. असं काही नव्हतं, पण त्याच्या बेभरवशाच्या फटक्याने संघाला अडचणीत टाकले. तो बाद झाला आणि ऋषभ पंतचीही संजीवनी बूटी संपली. तीन जीवदान लाभलेला पंत 42 धावांवर परतला आणि अब्जावधी हिंदुस्थानींचा हृदयाचा ठोका चुकला. मग पुढच्याच चेंडूवर मोहम्मद आमीरच्या चेंडूवर रवींद्र जाडेजाच्या विकेटनेही धक्का दिला.