
बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारांमुळे हिंदुस्थानात संतापाची लाट आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजून रहमानला IPL मधून वगळण्यात यावी, अशी मागणी देशभरात करण्यात येत होती. त्यानंतर BCCI ने केकेआरला निर्देश देत मुस्तफिजूरला संघातून काढण्याचे निर्देश दिले. आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बांगलादेशच्या संघाला टी20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानात न पाठवण्याच निर्णय घेतला आहे.
T20 World Cup 2026 हिंदुस्थान आणि श्रीलंका या दोन देशांच्या संयुक्त आयोजनामध्ये पार पडणार आहे. मात्र, आता बांगलादेशचा संघ हिंदुस्थानात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशचे क्रीड सल्लागार आसिफ नजरूल यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, “बांगलादेशचा संघ वर्ल्ड कप खेळण्यासाठी हिंदुस्थानात येणार नाही. आज बांगलादेश क्रिकेड बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. BCCI च्या हिंसक जातीय धोरणाच्या संदर्भात घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत.” असं आसिफ नजरूल यांनी म्हटलं आहे.
न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ जाहीर, गिल कर्णधार, बुमराह-हार्दिकला विश्रांती


























































