मोहतरामा भी किस खेत की मूली, है जरा बता…! माधवी भाभीच्या लुकवर नेटकरी फिदा

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेत्री सोनालिका जोशी सध्या चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सोनालिका माधवी भाभीची भूमिका साकारत आहे. या मालिकेत आपण तिला नेहमी साध्या मराठमोळ्या लूकमध्ये पाहिले आहे. मात्र खऱ्या आयुष्यात सोनालिका खूपच डॅशिंग आहे. अलीकडेच सोनारिकाने तिच्या एका फोटोशूटची रील सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे.

या फोटोशूटसाठी सोनारिकाने केलेला या लूकमुळे चाहते घायाळ झाले आहेत. या लूकमध्ये सोनालिका खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे.

फोटोंमध्ये सोनारिकाने काळ्या रंगाचा घागरा आणि सोनेरी रंगाची-चोली परिधान केली आहे. याचसोबत कंबरपट्टाही घातला आहे.

या लूकसाठी सोनालिकाने बोल्ड मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत. याचसोबत हातात मोठा कडा, नाकात नोझपीन आणि गळ्यात मोठा नेकलेस घातला आहे.

घागरा-चोलीच्या या लूकवर सोनालिकाने जबरदस्त पोझ दिल्या आहेत. सोनालिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांना हा लूक खूप आवडतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalika Sameer Joshi (@jsonalika)