
तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेस पक्षाने शुक्रवारीआपल्या २७ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. ‘लाईव्ह मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, या यादीत पक्षाने अनुभवी नेत्यांसह विविध मतदारसंघांतील उमेदवारांना संधी दिली आहे.
काँग्रेसच्या या यादीत अनेक महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. यात पक्षाचे वरिष्ठ नेते के. सेल्वपेरुंथगाई श्रीपेरुंबदुर (SC) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दुराई चंद्रशेखर पोन्नेरी (SC) मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.
दरम्यान, तमिळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर केला जाईल. काँग्रेस पक्ष एम.के. स्टालिन यांच्या द्रमुक (DMK) प्रणीत आघाडीचा भाग म्हणून ही निवडणूक लढवत आहे.
Congress releases a list of 27 candidates for the Tamil Nadu Assembly elections
Congress PCC chief K. Selvaperunthagai to contest from Sriperumbudur assembly constituency and former MP Dr A Chella Kumar from Krishnagiri pic.twitter.com/7zfHwPDnNP
— ANI (@ANI) April 3, 2026


























































