
राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. लाडकी बहीण योजना पुढे रेटण्यासाठी विविध मंत्रालयांच्या आणि जनसेवेच्या योजनांचे पैसे या योजनेकडे वळवण्यात आले. तरीही जमाखर्चाचा मेळ बसत नसल्याने आता सरकारने हॉटेल मालकांच्या खिशावर डल्ला मारत आहे. सरकारने केलेल्या अन्यायकारक करवाढीविरोधात सोमवारी ठाणे हॉटेल असोसिएशन आज एकदिवसीय हॉटेल बंद पुकारला आहे. या बंदमुळे अनेकांना फटका बसला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी पैसे हवेत म्हणून सरकारचा हॉटेल मालकांच्या खिशावर डल्ला मारल्याचे दिसत आहे. सरकारने परवाना शुल्क 15 टक्के वाढविले आहे तर उत्पादन शुल्क 60 टक्क्यांनी वाढविले आहे. सरकारने केलेली करवाढ अन्यायकारक असल्याचे हॉटेल, बार, रेस्टॉरंट असोसिएशनने म्हटले आहे. या करवाढीविरोधात ठाणे हॉटेल असोसिएशनने सोमवारी एकदिवसीय हॉटेल बंद पुकराला आहे. या बंदमुळे अनेकांचे खाण्याचे हाल झाले. तसेच हॉटेलमधून जेवण मागवणाऱ्या खवय्यांनाही फटका बसला आहे.
या करवाढीविरोधात हॉटेल, बार, रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने सोमवारी हॉटेल बंद पुकारण्यात आला होता. सरकारने अन्यायकारक कर वाढीच्या विरोधात ठाणे हॉटेल असोसिएशनकडून सोमवारी आंदोलन पुकारण्यात आले. ट्रिपल इंजिन सरकारच्या करवाढी विरोधात हॉटेल बंद आंदोलन करण्यात आले.