
ओमान 2028 पासून इन्कम टॅक्स लावणारा खाडीतील पहिला देश ठरणार आहे. ओमानमध्ये 5 टक्के टॅक्स लावण्यात येणार असून हा फक्त जास्त पैसे कमवणाऱ्यांविरुद्ध लावला जाणार आहे. ओमानचे अर्थमंत्री सईद बिन मोहम्मद अल साकरी यांनी या टॅक्सची माहिती दिली. जे लोक वार्षिक 42 हजार रियाल म्हणजेच 90 लाखांच्या वर वार्षिक पैसे कमवतील, त्या व्यक्तींना टॅक्स द्यावा लागणार आहे.
खाडी देशांत आतापर्यंत कोणताही टॅक्स लावला जात नव्हता. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या विदेशी लोकांना याचा फायदा होत होता. खाडी देशात मोठ्या प्रमाणात हिंदुस्थानातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी कामे करत आहेत. परंतु त्यांना आता टॅक्स द्यावा लागणार आहे. खाडी देशात म्हणजेच संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवेत, बहरिन आणि सौदी अरबकडे तेल आणि गॅसचा भरपूर साठा आहे. त्यातून त्यांना भरपूर पैसा मिळतो.