
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अवघ्या एका आठवडय़ावर येऊन ठेपलेली असताना हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आईला हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे मायदेशी परतावे लागले आहे. त्यामुळे गंभीरच्या अनुपस्थितीत, फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्पेल, सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डूशेट आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप हेडिंग्ले येथे सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी संघाच्या तयारीस मदत करतील.
रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्तीनंतर कर्णधारपदाची धुरा शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत उपकर्णधार असेल. हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात बार्ंमगहॅममधील एजबॅस्टन, लंडनमधील लॉर्ड्स, मँचेस्टरमधील ओल्ड ट्रफर्ड आणि लंडनमधील ओव्हल येथेही कसोटी सामने खेळणार आहे. 2007 नंतर प्रथम इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे हिंदुस्थानचे लक्ष्य आहे. 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इंग्लंडमधील कसोटी मालिका ही हिंदुस्थानची पहिलीच कामगिरी असेल.