
लातूरच्या देवणी तालुक्यातील कोनाळी गावात शुक्रवार 23 मे रोजी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 20 जणांविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिसऱया दिवशीही तणावग्रस्त परिस्थिती आहे. सदर प्रकरणातील आरोपीस न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आरोपीच्या हितचिंतकांनी गावात फटाके फोडले. हा रोष व्यक्त करत कोनाळीच्या समाजबांधवांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाकडे मागणी केली. सोमवारी देवणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला असून जिह्यातील विविध संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत.