थलैवाने ‘कुली’ चित्रपटासाठी घेतले 280 कोटी

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी लोकेश कनगराज यांच्या ‘कुली’ चित्रपटासाठी 280 कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचे बजेट 400 कोटी रुपये असून हा चित्रपट सर्वात महागडय़ा चित्रपटांपैकी एक आहे. 70 वर्षांच्या रजनीकांत यांना ‘कुली’ चित्रपटासाठी 260 ते 280 कोटी रुपये फी मिळाली आहे. त्यामुळे रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, जॅकी चैन यांसारख्या अभिनेत्यांना मागे टाकले आहे.

‘कुली’साठी अक्कीनेनी नागार्जून यांना 24 कोटी रुपये, तर आमीर खानला 25 ते 30 कोटी रुपये मिळाल्याची चर्चा आहे. या चित्रपटात श्रुती हसन, सत्यराज आणि उपेंद्र राव यांच्याही भूमिका आहेत, परंतु त्यांनी किती फी घेतली हे अद्याप समोर आले नाही. पूजा हेगडे एका स्पेशल गाण्यात दिसणार आहे. तिला यासाठी 2 कोटी रुपये दिले आहेत.