
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुंबईत विजेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंगचे अक्षरशः पीकच आले. मात्र पालिकेने धडक मोहीम राबवत ही होर्डिंग हटवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आज एकाच दिवसांत तब्बल 1903 होर्डिंग पालिकेने काढले. पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या होर्डिंगमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 571 बोर्ड-फलक राजकीय प्रकारातले होते. तर 912 प्रकारचे कापडी फलक या मोहिमेत हटवण्यात आले.