
आयफोन 17 सीरिजकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. अॅपल कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नवीन सीरिज लाँच करते. आता आयफोन 17 सीरिज सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. आयफोन 17 मध्ये काही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. कंपनी या सीरिजमध्ये प्लस मॉडलला हटवून त्याजागी आयफोन 17 एअर हे नवीन मॉडल लाँच करणार आहे. आयफोन 17 सीरिज ही आयओओस 26 सोबत लाँच कणार आहे.