
प्रबोधन गोरेगावच्या 45 व्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवात कराटे स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू (मुली) शिवोना झंझाळ (सेंट जॉन युनिव्हर्सल स्कूल, गोरेगाव प.) तर (मुले) किकक्षक खिल्लारे (एम. टी. एस खालसा हायस्कूल, गोरेगाव पूर्व) ठरले. या स्पर्धेमध्ये एकूण 54 शाळा आणि 321 विद्यार्थी सहभागी झाले होते. दोन्ही खेळाडूंनी काथा आणि कुमीते या दोन्ही कराटे प्रकारात बाजी मारली. सांघिक पुरस्कार डॉ. एस. राधाकृष्णन इंटरनॅशनल स्कूल (68 गुण), सेंट थॉमस ऍकॅडमी, गोरेगाव (प.) (46 गुण), एम. टी. एस. खालसा हायस्कूलने (27 गुण) पटकावले.
सान्वी आणि शौर्यनेबाजी मारला
मल्लखांब स्पर्धेमध्ये सेंट रॉक हायस्कूल, बोरिवली (पू.) शौर्य नाईकने 8.40 गुण, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या सान्वी सावंत (8.10 गुण) सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला. सांघिक पुरस्कारामध्ये पाठक टेक्निकल हायस्कूल, वांद्रे (पू. ) 122.30 तर महात्मा गांधी हायस्कूल, वांद्रे (पू. ) 103.35 गुण प्राप्त केले.