पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 485 अंक वधारून 84,065 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 173 अंकांनी वाढून 25,867 अंकांवर बंद झाला. 3003 शेअर्समध्ये वाढ, तर 1182 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. स्टेट बँक ऑफ इंडिया, श्रीराम फायनान्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, इटरनल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, इंडिगो, ट्रेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन ऍण्ड टुब्रो, सन फार्मास्युटिकल्स, एशियन पेंट्स, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे शेअर्स वाढले, तर मॅक्स हेल्थकेयर, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी इंडिया, ऑक्सिस बँकेचे शेअर्स घसरले.