
शेअर बाजारात आठवडाभरापासून चढ-उताराचा खेळ सुरू आहे. गुरुवारी शेअर बाजार 582 अंकांनी कोसळल्यानंतर आज शुक्रवारी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळाला. एक टक्क्याहून अधिक वाढीसह सेन्सेक्स आणि निफ्टी बंद झाले. सेन्सेक्स 820 अंकांनी वाढून 79,705 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 104 अंकांनी वाढून 24,367 अंकांवर बंद झाला. बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 28 शेअर्समध्ये वाढ झाली. यात सर्वात जास्त महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 3.08 टक्के वाढले. टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये वाढ झाली. सेन्सेक्सच्या दोन शेअर्समध्ये घसरण झाली. यात कोटक महिंद्रा बँक आणि सन फार्माच्या शेअरमध्ये किरकोळ घसरण झाली. एक्स्चेंजवरील एकूण 4006 शेअर्सपैकी 2332 शेअर्स वाढीसोबत बंद झाले, तर 1571 शेअर्समध्ये घसरण झाली. 103 शेअर्स कोणत्याही फायदा-तोट्याविना बंद झाले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.42 कोटींची वाढ
शुक्रवारी शेअर बाजारात उत्साह आल्यानंतर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.42 कोटी रुपयांची वाढ झाली. गुरुवारी एकूण मार्केट पॅप 445.75 लाख कोटी रुपये होता. तो आज वाढून 450.17 लाख कोटी रुपये झाला. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी आज 4.42 लाख कोटी रुपयांची कमाई केली.