मोबाईल नंबर बदलणार… 21 वर्षांनतर ट्रायचा निर्णय

द टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने नॅशनल नंबरिंग प्लॅनमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 2003 मध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. सध्या सबस्क्रायबर्स वाढले आहेत आणि 5 जी नेटवर्कचे जाळे विस्तारत आहे, या पार्श्वभूमीवर मोबाईल नंबर बदलले जातील.

ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे मोबाईल कंपन्यांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. सेवांमध्येही सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे यासाङ्गी स्वतंत्र क्रमांकाचा विचार केला जात आहे. नॅशनल नंबरिंग प्लॅनच्या मदतीने दूरसंचार आयडेंटिफायर ओळखले जातात आणि ते महत्त्वाची भूमिका बजावतात. 2003 मध्ये देशभरातील 750 दशलक्ष टेलिफोन कनेक्शनसाङ्गी नंबरिंग रिसोर्सेस वाटप करण्यात आली.

फसव्या मेसेजपासून सावधान 

ट्रायचे प्रतिनिधित्व करण्याचा खोटा दावा करणाऱया आणि सेवा खंडित करण्याची धमकी देणाऱया थर्ड पार्टी एजन्सींपासून सतर्क राहण्यास ट्रायने सांगितले आहे. नंबर डिस्कनेक्शनबाबत ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी एजन्सीला अपॉईंट केलेले नाही, असे ट्रायने स्पष्ट केले.