
सध्याच्या ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये आपल्या डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळे ही सौंदर्यास बाधा आणतात. काळी वर्तुळे अधिक गडद झाल्यास, चेहरा कोमेजलेला दिसतो. त्यामुळेच या काळ्या वर्तुळांवर अगदी कमी खर्चाचा उपाय आपल्याच आजूबाजूला उपलब्ध आहे. ते म्हणजे एक केळे. एका केळ्यामुळेच आपल्या डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर उपाय करता येणार आहे.
चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण नानाविध गोष्टी करतो. परंतु आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गुणकारी गोष्टींकडे मात्र खूपदा दुर्लक्ष करतो. नानाविध रसायनांची प्रोडक्टस् वापरुन चेहरा खराब झाल्यानंतर आपण घरगुती उपायांकडे वळतो.
हिवाळ्यात गर्भवती महिलांनी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? जाणुन घ्या
केळीची साल चेहऱ्यावर लावण्याचे फायदे
केळीच्या सालीमुळे आपला चेहरा हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. तसेच केळीच्या सालीतील व्हिटॅमिन सी त्वचेला नैसर्गिक चमक देते.
केळीच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन बी- 6 त्वचेला निरोगी आणि ताजेतवाने ठेवते. त्यामुळेच आपल्या त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या टाळण्यास मदत मिळते.
केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6 आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक तुमच्या त्वचेला पोषण देतात.
चेहऱ्यावरील डागांसाठी जायफळचा वापर कसा करायला हवा, जाणून घ्या
चेहऱ्यावर केळीची साल कशी लावावी?
एक पिकलेले केळं घेऊन ते सोलून घ्या. सालीचा आतला पांढरा भाग तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर हलके घासून 5-7 मिनिटे ठेवा. नंतर ते 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्यावरील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय मानला जातो.
केळीच्या सालीचे फायदे
काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते.
मुरुम आणि त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते.
अकाली सुरकुत्या रोखते, यामुळे त्वचा तरुण दिसू लागते.
चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते, यामुळे त्वचेला तजेला येतो.
त्वचेचा कोरडेपणा दूर करते आणि ती मऊ आणि हायड्रेटेड बनवते.
मध्यमवयीन महिलांनी मेकअप करताना या टिप्स समोर ठेवायला हव्यात, वाचा





























































