
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका जनसभेत बोलताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्ला चढवला. “जो कोणी भाजप-आरएसएसवर प्रश्न उपस्थित करतो, त्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते,” असा आरोप त्यांनी यावेळी केला. केरळममधील एर्नाकुलम बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “भाजपच्या विरोधात बोलल्यामुळे माझ्यावर आतापर्यंत ३६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी माझे सरकारी निवासस्थान हिरावून घेतले आणि माझी लोकसभा सदस्यताही रद्द केली होती. सध्या मी जामिनावर आहे आणि ईडीने (ED) माझी तब्बल ५५ तास चौकशी केली होती.”
राहुल गांधी यांनी यावेळी केरळमधील सत्ताधारी डाव्या आघाडीच्या (Left Front) कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना उद्देशून प्रश्न विचारला. ते म्हणाले, “मी डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांना विचारू इच्छितो की, तुमच्या नेत्यांना किंवा तुमच्या मुख्यमंत्र्यांना कधीही असे प्रश्न का विचारले जात नाहीत? सीबीआय (CBI), ईडी किंवा आयकर विभागाने त्यांच्यावर कधीही हल्ला का केला नाही?” यामागचे कारण सांगताना राहुल गांधी म्हणाले की, “याचे कारण तुम्हालाही चांगले ठाऊक आहे. तुमचे मुख्यमंत्री आपल्या भ्रष्टाचारामुळे भाजपसोबत तडजोड करून बसले आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.”
#WATCH | एर्नाकुलम, केरलम: लोकसभा में नेता प्रतिपक्ष व कांग्रेस सांसद राहुल गांधी ने जनसभा को संबोधित करते हुए कहा, “जो भी भाजपा-RSS पर सवाल करता है उसे टारगेट किया जाता है। मेरे खिलाफ 36 केस हुए हैं, उन्होंने मेरा सरकारी आवास, मेरी लोकसभा सदस्यता रद्द कर दी थी, मैं बेल पर हूं,… pic.twitter.com/frF0P66dtO
— ANI_HindiNews (@AHindinews) April 4, 2026


























































