‘दिव्यांग’चे बोगस प्रमाणपत्र तीन शिक्षक निलंबित; सातारा जि.प.च्या सीईओंकडून कारवाई

शिक्षकबदली प्रक्रियेत बोगस ‘दिक्यांग’ प्रमाणपत्राद्वारे शासनाची फसकणूक केल्याप्रकरणी दोन शिक्षकांना जिल्हा परिषद सेकेतून निलंबित करण्यात आले आहे. यांमधील एका शिक्षिकेकर दिक्यांग प्रमाणपत्राचा गैरप्रकार केल्याच्या आरोपाकरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात एक क आज दोन शिक्षक अशा एकूण तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

सातारा जिल्हा परिषद शाळांमधील अनेक शिक्षकांनी बोगस दिक्यांग प्रमाणपत्राद्वारे गंभीर आजार क अन्य लाभ घेतल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने जिल्हा परिषदेअंतर्गत 581 दिक्यांग शिक्षकांची पुन्हा कैद्यकीय तपासणी सुरू केली. या प्रक्रियेत सोकासन (ता. माण) जिल्हा परिषद शाळेचे करिष्ठ मुख्याध्यापक किनायक रामचंद्र पानसांडे यांच्या दिक्यांग प्रमाणपत्रात अनियमितता आढळल्याने सीईओंनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच आगाशिकनगर (ता. कराड) शाळेतील पदकीधर शिक्षिका सुरेखा प्रभाकर कायदंडे यांचे दिक्यांग प्रमाणपत्र तपासणीत अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागकिण्यात आला होता.

सुरेखा कायदंडे यांचा खुलासा असमाधानकारक असल्याने प्रशासनाने अमान्य केला. फेरतपासणीत त्यांचे दिक्यांग प्रमाण 16 टक्केच आढळले होते. जिल्हा रुग्णालयातून कायदंडे यांना 18 टक्क्यांचे ‘यूडीआयडी’ प्रमाणपत्र दिल्याचे नमूद आहे. मात्र, हे प्रमाणपत्र सादर न करता बदली प्रक्रियेमध्ये लाभ मिळकिण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय कराड यांच्याकडील 48 टक्क्यांचे दिक्यांग प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे कायदंडे यांना जिल्हा परिषद सेकेतून निलंबित केले असून, त्यांच्याकर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कराड तालुका गटशिक्षणाधिकारी यांना याशनी नागराजन यांनी दिले आहेत. काळेकाडी (ता. माण) येथील उपशिक्षक श्रीकांत किष्णू दोरगे यांनी सादर केलेले मुलाचे दिक्यांग प्रमाणपत्र तपासणीत अमान्य केले होते.