असं झालं तर… फराळ खाण्यासाठी आग्रह झाला तर…

सध्या देशभरात दिवाळीचा सण उत्साहात सुरू आहे. घरोघरी करंजी, लाडू, चकली, मिठाई बनवण्यात आली आहे. सणासुदीत एकमेकांच्या घरी गेल्यानंतर हमखास फराळ दिला जातो.

जर मित्रमंडळी किंवा नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर तुमच्यासमोर फराळ आला तर शक्यतो खाणे टाळा. जर कोणी फार आग्रह केला तर थोडय़ा प्रमाणात फराळ खा.

फराळ खाताना कमी कॅलरीज असलेले पदार्थ निवडा. फराळ खाताना गोड पदार्थ खाण्याऐवजी ड्राय फ्रूट्स खाण्याला प्राधान्य द्या. काही वेळा भूक नाही, नंतर खाईल असेही म्हणा.

जर तुम्ही घरातून जेवण करून आला असाल तर समोरच्या व्यक्तीला जेवण करून आलोय, असे सांगू शकता. दिवाळीत आरोग्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे.

नातेवाईकांच्या घरी गेल्यावर गोड फराळाला निःसंकोचपणे नाही म्हणा. शुगर वाढेल असे कोणतेही पदार्थ खाणे टाळा. रक्तातील साखर जास्त वाढली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.