
– पावसाळ्याच्या दिवसात घरातील लाकडी फर्निचर खराब होण्याचे प्रकार वाढतात. फर्निचरला नियमितपणे कोरडय़ा किंवा किंचित ओल्या कापडाने स्वच्छ करा. जास्त पाणी वापरणे टाळावे. फर्निचर ओल्या किंवा दमट ठिकाणी ठेवू नका. हवेशीर ठिकाणी ठेवा.
– पावसाळ्यात खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा, जेणेकरून थेट पाणी फर्निचरवर पडणार नाही. फर्निचरला वॅक्स किंवा सीलंट लावा, ज्यामुळे ते पाण्यापासून सुरक्षित राहील. बाजारात लाकडी फर्निचरसाठी खास उपलब्ध असलेली उत्पादने फर्निचर पॉलिश आणि क्लीनर वापरा.