
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांना उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. पार्थ यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. दिवंगत अजित पवार यांची आठवण म्हणून पार्थ पवार यांनी यावेळी गुलाबी जॅकेट परिधान केले होते. त्यांच्या या पेहरावाने लक्ष वेधून घेतले. या प्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, काँग्रेस नेते जयराम रमेश, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे यावेळी उपस्थित होते.
आता तीन नाही, चार वर्षांनी पदवी!
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शैक्षणिक वर्ष 2026-2027 नुसार आता तीन नाही, तर चार वर्षांनी पदवी मिळणार आहे. चार वर्षांच्या या पदवी अभ्यासक्रमात चौथे वर्ष ‘ऑनर्स’ व ‘वॉनर्स विथ रिसर्च’ लागू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यानुसार राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे व संलग्न, स्वायत्त महाविद्यालयांमध्ये चौथ्या वर्षाच्या ऑनर्स व ऑनर्स विथ रिसर्च अभ्यासक्रमांमध्ये सुसूत्रता, प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करण्यात आली आहेत. या निर्णयानुसार महाविद्यालयांना चौथ्या वर्षासाठी स्वतंत्र मान्यता घ्यावी लागेल.
गॅस कनेक्शन बंदच्या नावाखाली 40 लाख रुपये काढले
गॅस कनेक्शन बंदची भीती दाखवत एपिके फाईल पाठवून ठगाने व्यावसायिकाच्या बँक खात्यातून 40 लाख रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदाराला गेल्या आठवडय़ात मोबाईलवर एक मेसेज आला. आज रात्रीपासून तुमच्या गॅसचा पुरवठा बंद केला जाणार आहे. मेसेजखाली नमूद नंबरवर तक्रारदाराने पह्न केला. पह्न करणाऱयाने त्याचे नाव सांगून गॅसचे बिल बाकी असल्याचे भासवले. त्यासाठी सात रुपये भरावे लागतील अशा भुलथापा मारल्या. ठगाने त्याना व्हॉट्सअपवर एपिके फाइल्स पाठवली. काही वेळाने व्हिडिओ कॉल करून ठगाने डेबिट कार्डची माहिती घेऊन 40 लाख 86 हजार रुपये काढले.



























































