
पंतप्रधान मोदी हे कितीही ‘माय फ्रेंड डोनाल्ड’ म्हणत असले तरी अमेरिकेकडून सातत्याने हिंदुस्थानची कोंडी होत आहेत. गुरुवारी अमेरिकेने हिंदुस्थानवर 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. आता दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण व्यापार करार का पूर्ण होऊ शकला नाही, याबाबत अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी पंतप्रधान ‘मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला नसल्याने ही डील रद्द झाली,’ असे म्हटले आहे. यावरून काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
एका पॉडकास्टमध्ये हॉवर्ड लुटनिक म्हणाले, ‘‘हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे बारीक लक्ष होते. ट्रम्प यांनीच सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या होत्या. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना फोन करणे आवश्यक होते; परंतु मोदी यांनी फोन केला नाही. त्यामुळे डील रद्द झाले. चर्चेचा तो शुक्रवार निघून गेल्यानंतर अमेरिकेने पुढच्या आठवडय़ात इंडोनेशिया, फिलिपाइन्स आणि व्हिएतनामबरोबर वाटाघटी सुरू केल्या आणि उच्च दराने व्यापार करार केला’’.
































































