व्हीआयपी शोबाजी, गाडय़ांवर लाल, निळे दिवे लावणाऱयांना दणका; वाहतूक पोलिसांची 83 गाडय़ांवर धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हीआयपी असल्याचा तोरा दाखविण्यासाठी, तर कधी वाहतूककाsंडीतून अथवा विरुद्ध दिशेने झटपट जाण्यासाठी खासगी वाहनांच्या टपावर लाल, पिवळा, निळा दिवा लावणाऱयांना मुंबई वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला. पोलिसांनी गाडय़ांवर बेकायदेशीरपणे दिवे तसेच सायरन लावणाऱयांविरोधात दोन दिवस विशेष मोहीम राबवून 83 जणांवर कारवाया केल्या.

खासगी वाहनांवर बेकायदेशीरपणे लाल, पिवळे, निळे दिवे लावून अनेक जण राजरोस फिरतात. तसेच अनेकांनी गाडय़ांमध्ये सायरनदेखील लावले असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. याची गंभीर दखल घेत सह आयुक्त अनिल पुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक योगेश चव्हाण व मुबारक शेख यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी बेकायदेशीर गाडय़ांवर दिवे तसेच सायरन लावणाऱयांविरोधात 1 व 2 एप्रिल रोजी विशेष मोहीम राबविली. दक्षिण व पश्चिम उपनगरात राबविलेल्या या मोहिमेमध्ये 83 गाडय़ा दिवे लावून शायनिंग मारताना आढळून आल्या. अशा दिवे लावणाऱया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच 80 दिवे (डोम लाईट्स) आणि तीन सायरन जप्त करण्यात आले.