
सोशल मीडियावर कधी कोण व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. *‘थिअरी थर्टीन’*ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ‘३० पुश-अप्स करा आणि तुमच्या आवडत्या स्त्रीसाठी कानातल्यांची जोडी जिंका’ असा मजकूर असलेला एक बोर्ड त्या व्हिडीओमध्ये दिसतो.
हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तरुण मंडळी नव्हे, तर एक वृद्ध जोडपे पुढे येते. आजोबांनी क्षणाचाही विलंब न करता पुश-अप्स करायला सुरुवात केली. कुठेही थकवा नाही, ना चेहऱ्यावर हरण्याची चिंता—उलट तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह दिसून येतो. आजीसाठी कानातले जिंकण्याची त्यांची जिद्द स्पष्टपणे जाणवते.
























































