पहलगाममध्ये हल्ला करणारी ‘टीआरएफ’ अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित

terrorist

अमेरिकेने पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या टीआरएफ अर्थात द रेझिस्टन्स फ्रंटला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. परदेशी दहशतवादी संघटना आणि विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी या यादीत अमेरिकेने टीआरएफला टाकले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी याप्रकरणी निवेदन जारी करून माहिती दिली.

लष्कर ए तोयबाची आघाडी असलेल्या टीआरएफने 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-कश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. 2008 च्या मुंबई हल्ल्यानतंर लष्करने हिंदुस्थानातील नागरिकांवर केलेला हा सर्वात घातक हल्ला होता, असे मार्को रुबियो यांनी निवेदनात म्हटले आहे. टीआरएफने 2024 च्या हल्ल्यासह हिंदुस्थानच्या सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.