वामन प्रभू यांच्या स्मृतींना उजाळा, मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

शिवसेना नेते, विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांचे वडील वामन प्रभू यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची प्रार्थनासभा रविवारी आयोजित केली होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वामन प्रभू यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

गोरेगाव पूर्व येथील श्री गुजर क्षत्रिय कडिया समाज हॉल येथे आयोजित केलेल्या या प्रार्थनासभेला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नातेवाईक, मित्रमंडळी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, उद्योजक, बँकिंग, क्रीडा, आध्यात्मिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वामन प्रभू यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच उपनगरचे पालकमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते अनंत गीते, शिवसेना नेते विनायक राऊत, माजी खासदार गोपाळ शेट्टी, उपनेते विनोद घोसाळकर, अमोल कीर्तिकर, उपनेते व आमदार सचिन अहिर, उपनेत्या विशाखा राऊत, आमदार सुनील शिंदे, बाळा नर, ज. मो. अभ्यंकर, विद्या ठाकूर, अतुल भातखळकर, योगेश सागर, मनीषा चौधरी, राजहंस सिंह, संजय उपाध्याय आदी मान्यवरांनी आमदार सुनील प्रभू, त्यांचे बंधू शिवराम प्रभू, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू आणि प्रभू कुटुंबीयांचे सांत्वन केले.