डॉ. जयसिंगराव पवार यांची आज शोकसभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ.जयसिंगराव पवार यांची शोकसभा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने उद्या (रविवार) संध्याकाळी पाच वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र मुणगेकर असतील. इतिहास संशोधन मंडळाचे संचालक डॉ. दीपक पवारही उपस्थित राहणार आहेत.