
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या पहिल्या टप्प्यासाठी तृणमूल काँग्रेसने (TMC) शनिवारी आपल्या स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यासह पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त सुब्रत बक्षी, चंद्रिमा भट्टाचार्य, फिरहाद हकीम, अरुप विश्वास, कल्याण बॅनर्जी, डॉ. मानस रंजन भुनिया, डॉ. शशी पांजा, स्नेहाशिष चक्रवर्ती आणि बिरबाहा हांसदा यांसारखी महत्त्वाची नावे या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. तसेच शत्रुघ्न सिन्हा, कुणाल घोष, दीपक अधिकारी (देव), महुआ मोइत्रा, कीर्ती आझाद, शताब्दी रॉय, पार्थ भौमिक आणि सायोनी घोष यांसारख्या प्रसिद्ध चेहऱ्यांकडेही प्रचाराची धुरा सोपवण्यात आली आहे.
निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरला असून २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे, तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर माणिकचक येथील जाहीर सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी मतदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. जर पुढची ५ वर्षे शांततेत जगायचे असेल, तर भाजपला रोखणे आवश्यक आहे, कारण हा पक्ष देश उद्ध्वस्त करेल आणि कोणत्याही धर्माचा आदर करत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
TMC releases a list of star campaigners for West Bengal (Phase I) in connection with the ensuing General Elections to the Legislative Assembly of West Bengal, 2026, including CM Mamata Banerjee, AITC General Secretary Abhishek Banerjee, TMC leaders Fairhad Hakim, Subrata Bakshi,… pic.twitter.com/zeu3IcTTAB
— ANI (@ANI) April 4, 2026


























































