ट्रम्प यांचा ग्रीनलँडवर डोळा, प्रत्येक नागरिकाला 90 लाख देणार

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना पकडल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर मोर्चा वळवला आहे. गेल्या काही वर्षांपासून  ‘ग्रीनलँड’वर ट्रम्प यांचा डोळा आहे. यासाठी ते साम, दाम, दंड… अशा मार्गांचा अवलंब करण्यासही तयार आहेत. त्यांनी ग्रीनलँड मिळवण्यासाठी नवीन युक्ती लढवली आहे. ट्रम्प प्रशासनाने थेट तेथील नागरिकांना आर्थिक आमिष देण्याच्या पर्यायावर विचार सुरू केला आहे. ग्रीनलँडमधील नागरिकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी ट्रम्प सरकार प्रत्येक नागरिकाला 10 हजार  ते एक लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 9 लाख ते 90 लाख रुपये एकरकमी देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे.  

डोनाल्ड ट्रम्प यांना डेन्मार्क नडला

ट्रम्प यांना डेन्मार्क नडला आहे. कोणत्याही परकीय शक्तीने आमच्या परिसरावर हल्ला केल्यास आमचे सैनिका कोणाच्याही आदेशाविना तत्काळ प्रत्युत्तर देतील, असा इशारा डेन्मार्कने दिला आहे. ग्रीनलँड हे 300 वर्षांपासून डेन्मार्कच्या नियंत्रणात आहे. विना आदेश प्रत्युत्तर देण्याचा तेथे सैनिकांना निर्देश वर्ष 1940पासून आहेत.