
सध्या अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात अशांतता आणि आर्थिक अस्वस्थता वाढली आहे. अमेरिकेला आता रशियानेही चोख प्रत्युत्तर दिले असून हिंदुस्थाननेही टॅरिफ वाढीच्या धमकीवर अमेरिकाही रशियासोबत व्यापार करत असल्याचे सुनावले आहे. या सर्व घडामोडींचा शेअर बाजारावर परिणाम दिसून येत असून मंगळवारी बाजारात मोठी घसरण झाली आहे. टॅरिफचा तणाव असाच वाढत राहिला तर शेअर बाजारात आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
या आठवड्याच्या सुरवातील सोमवारी बाजार चांगलाच सावरला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला होती. मात्र, मंदळवारी बाजारासुरू होताच मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 400 अंकांनी घसरला, तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 100 अंकांपेक्षा जास्त घसरला होता.
शेअर बाजारात व्यवहार सुरू झाला तेव्हा, सेन्सेक्स 80,946.43 वर सुरू झाला. सोमवारी निर्देशांक 81,018.72 वर बंद झाला होता. बाजार सुरू होताच त्यात 440 अंकांची घसरला झाली आणि तो 80,558.94 च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टी-50 मध्येही अशाच प्रकारची घसरण दिसून आली. सोमवारी तो 24,722 वर बंद झाला होता. आज बाजार सुरू होताच तो 121.85 अकांच्या घसरणीसह 24,593 वर व्यवहार करत होता.
शेअर मार्केटमध्ये अचानक झालेल्या घसरणीचा सर्वात जास्त फटका अदानी पोर्ट्सला बसला. त्याच्या शेअरमध्ये 1.40 अकांची घसरण झाली. त्यानंतर बीईएल शेअर (1.30%), इन्फोसिस शेअर (1.25%) आणि रिलायन्स शेअर सुमारे 1% ने घसरले. अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम गेल्या काही काळापासून सेन्सेक्स-निफ्टीसह सर्व आशियाई बाजारांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. सोमवारी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीला मुद्दा बनवून हिंदुस्थानला लक्ष्य केले आणि वाढीव टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. हिंदुस्थाननेही अमेरिकेला म्हणत प्रत्युत्तर दिले आहे की, हिंदुस्थानवर टीका करणारे स्वतः रशियाशी व्यापार करत आहेत. त्यामुळे आगामी काळात टॅरिफ वॉर भडकण्याची शक्यता असून बाजारावरही त्याचा परिणाम होणार आहे.