
अचानक कान दुखत असेल तर जास्त चिंता करण्याची गरज नाही. यावर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधीत एका स्वच्छ कापडाला गरम किंवा थंड पाण्यात भिजवून पिळून घ्या. दहा ते पंधरा मिनिटे कानावर ठेवा. कोमट ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब कानात टाका.
संत्रा, लिंबू, आवळा यांसारख्या व्हिटॅमिन सी फळांचे सेवन केल्याने कानदुखी कमी होते. पुरेसे पाणी प्यायल्याने कानदुखी थांबते. ज्या बाजूला कान दुखतो, त्या बाजूला अंगठे ठेऊन झोपल्यास आराम मिळतो. जर कानदुखी जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.