
आपल्या घरी नेलपेंटच्या बाटल्या असतात. मात्र त्यातील नेलपेंट काही वेळेला सुकलेली दिसते. अशा वेळी सोपे उपाय करता येतील. नेलपेंटची बाटली गरम पाण्याच्या वाटीत तीन मिनिटे बुडवून ठेवा. नंतर बाटली तळहातांमध्ये हलक्या हाताने फिरवा. थिनरचे 2-3 थेंब थेट बाटलीत टाका, बाटली घट्ट बंद करा आणि हलक्या हाताने फिरवा. आवश्यकतेनुसार ही प्रक्रिया पुन्हा करा.
एसीटोनचे काही थेंब नेलपेंटमध्ये घाला. हा एक त्वरित उपाय आहे, परंतु यामुळे पॉलिशचा पोत बदलू शकतो. म्हणून हे सावधगिरीने वापरा. नेलपेंटचा ब्रश बाटलीत बुडवताना किंवा लावताना बाटलीचे झाकण शक्य तितके बंद ठेवा. नेलपेंट फ्रिजमध्ये ठेवू नका. त्याऐवजी सामान्य तापमानात ठेवा. कारण थंडीमुळे गुठळ्या तयार होऊ शकतात. नेलपेंट लावताना पंखा बंद करा.