
अनेक दिवसांनंतर कूलर चालू करता तेव्हा थंड हवेबरोबर दुर्गंधी येते. त्यासाठी दर आठवड्याला कूलरमधील पाणी स्वच्छ करावे लागते. कूलरच्या पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करा. यामुळे कूलरमधील कुबट वास काही मिनिटांत दूर होईल.
कडुलिंबाची पाने थोडी कुटून सुती कापडात बांधून ठेवा. यानंतर कापडाची ही पोटली कूलरच्या पाण्यात ठेवा. किंवा संत्र्याची साल उन्हात कडकडीत सुकवा आणि तिची बारीक पावडर तयार करा. ही पावडर कूलरच्या आत शिंपडा.



























































